भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४९० :
मुचलक्याऐवजी (प्रतिज्ञापत्र) अनामत रक्कम घेणे :
जेव्हा न्यायालयाने किंवा अधिकाऱ्याने कोणत्याही व्यक्तीला बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित करण्यास सांगितले असेल तेव्हा, असे न्यायालय किंवा अधिकारी चांगल्या वर्तणुकीबद्दलच्या बंधपत्राची बाब खेरीजकरून अन्य बाबतीत, असे बंधपत्र निष्पादित करण्याऐवजी न्यायालय किंवा अधिकारी ठरवील इतकी रक्कम किंवा इतक्या रकमेच्या सरकारी वचनचिठ्या अनमात ठेवण्यास परवानगी देऊ शकेल.