भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४८९ :
जामीनदारीतून मुक्ततात मिळविणे :
१) जामिनावर सोडलेल्या व्यक्तीच्या समक्ष हजेरीसाठी व उपस्थितीसाठी देण्यात आलेल्या सर्व जामीनदरांना किंवा त्यांपैकी कोणालही कोणत्याही वेळी दंडाधिकाऱ्याकडे असा अर्ज करता येईल की, बंधपत्र संपूर्णपणे किंवा अर्जदारांशी संबंधित असेल तेवढ्या मर्यादेपर्यंत विसर्जित करावे.
२) असा अर्ज करण्यात आल्यावर, याप्रमाणे सोडलेल्या व्यक्तीला आपणांपुढे आणले जावे असा निदेश देणारे आपले अटक-वॉरंट दंडाधिकारी काढील.
३) वॉरंटाच्या अनुरोधाने अशी व्यक्ती उपस्थित झाल्यावर किंवा ती स्वेच्छेने स्वाधीन झाल्यावर, दंडाधिकारी, बंधपत्र संपूर्णपणे किंवा अर्जदारांशी संबंधित असेल तेवढ्या मर्यादेपर्यंत विसर्जित करण्याचा निदेश देईल, व अशा व्यक्तीला अन्य पुरेसे जामीनदार देण्यास फर्मावील व जर तिने तसे करण्यात कसूर केली तर, तिला तुरूंगात पाठवील.