भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४८८ :
पहिल्यांदा घेतलेला जामीन पुरेसा नसेल तेव्हा पुरेशा जामिनाचा आदेश देण्याचा अधिकार. :
जर चुकीमुळे, कपटामुळे किंवा अन्य कारणामुळे अपुरे जामीनदार स्वीकारण्यात आले किंवा ते नंतर अपुरे ठरले तर, न्यायालय जमिनावर सोडलेल्या व्यक्तीला आपणांपुढे आणले जावे असे निदेशित करणारे अटकेले वॉरंट काढून तिला पुरेसे जामीनदार देण्याचा आदेश देऊ शकेल व तिने तसे करण्यात कसून केली तर, तिला तुरूंगात पाठवू शकेल.