भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४८७ :
हवालतीमधून मुक्तता :
१) जिच्या उपस्थितीसाठी बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित केले गेले असेल त्या व्यक्तीला बंधपत्र निष्पादित होताच सोडले जाईल; व ती जेवहा तुरूंगात असेल तेव्हा तिला जामिनादेश देणारे न्यायालय तुरूंगाच्या अंमलदार अधिकाऱ्याला सुटका करण्याचा आदेश देईल व तो आदेश मिळाल्यावर असा अधिकारी त्याला सोडून देईल.
२) हे कलम, कलम ४७८ किंवा कलम ४८० यामधील कोणत्याही गोष्टीमुळे, ज्याच्यासाठी बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित केले त्याहून अन्य कोणत्याही कामासंबंधात स्थानबद्ध केले जाण्यास पात्र असलेल्या कोणत्याही व्यक्तीची सुटका आवश्यक ठरते असे मानले जाणार नाही.