भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४८४ :
बंधपत्राची रक्कम व ती कमी करणे :
१) या प्रकरणाखाली निष्पादित केलेल्या प्रत्येक बंधपत्राची रक्कम प्रकरणाच्या परिस्थितीचा योग्य तो विचार करून नियत केली जाईल व ती अत्याधिक असता कामा नये.
२) पोलीस अधिकाऱ्याने किंवा दंडाधिकाऱ्याने आवश्यक केलेला जामीन कमी करावा असे उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय निदेशित करू शकेल.