Bnss कलम ४७५ : विवक्षित परिस्थितती शिक्षा माफकरणे, सौम्य करणे यावर निर्बंध :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४७५ :
विवक्षित परिस्थितती शिक्षा माफकरणे, सौम्य करणे यावर निर्बंध :
कलम ४७३ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, ज्या अपराधाबद्दल कायद्याद्वारे उपबंधित केलेल्या शिक्षांपैकी मृत्युदंड ही एक शिक्षा असेल अशा अपराधाबद्दल एखाद्या व्यक्तीला सिद्धदोष ठरवल्या नंतर आजीव कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली असेल किंवा एखाद्या व्यक्तीला ठोठावण्यात आलेली मृत्यूची शिक्षा कलम ४७४ खाली आजीव कारावासाच्या शिक्षेत परावर्तित करून, सौम्य करण्यात आली असेल त्या बाबतीत अशा व्यक्तीने किमान चौदा वर्षे कारावास भोगल्याखेरीज तिला कारागृहातून मुक्त केले जाणार नाही.

Leave a Reply