Bnss कलम ४७४ : शिक्षा सौम्य करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४७४ :
शिक्षा सौम्य करण्याचा अधिकार :
समुचित सरकारला, शिक्षा झालेल्या व्यक्तीच्या संमतीशिवाय,
(a) क) (अ) मृत्यूची शिक्षा ही आजीवन कारावासाच्या शिक्षेत परिवर्तित करून;
(b) ख) (ब) आजीव कारावासाची शिक्षा ही जास्तीत जास्त सात वर्षे इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेत परिवर्तित करून;
(c) ग) (क) सात वर्ष किंवा अधिक कारावासाची शिक्षा ही जास्तीत जास्त तीन वर्षे इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेत परिवर्तित करुन;
(d) घ) (ड) सात वर्षापेक्षा कमी कारावासाची शिक्षा ही द्रव्यदंडाच्या शिक्षेत परिवर्तित करून,
(e) ड) (इ) सश्रम कारावासाची शिक्षा ही त्या व्यक्तीला जितक्या मुदतीच्या साध्या कारावासाची शिक्षा देता आली असती तितक्या मुदतीच्या साध्या कारावासाच्या शिक्षेत परिवर्तित करून;
सौम्य करता येईल.

Leave a Reply