भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४७१ :
जे पैसे देण्याबद्दल आदेश असेल ते द्रव्यदंड म्हणून वसूल करावयाचे :
या संहितेकाली दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या आधारे (द्रव्यदंडाहून अन्य असे) जे पैसे येणे असून ते वसूल करण्याच्या पद्धतीबाबत अन्यथा स्पष्टपणे उपबंध केला नसेल ते म्हणजे जणू काही द्रव्यदंड असावा त्याप्रमाणे वसूल करता येण्यासारखे असतील:
परंतु, कलम ४६१ खालील आदेशास कलम ४०० लागू करताना, या कलमाच्या आधारे जणू काही कलम ४६१ मधील पोटकलम (१) च्या परंतुकात, कलम ३९५ खाली द्रव्यदंडातून खर्च किंवा भरपाई देण्याचा आदेश या मजकुरानंतर किंवा कलम ४०० खाली वादखर्च देण्याचा आदेश हा मजकूर अंतर्भूत केलेला असावा त्याप्रमाणे त्या कलमाचा अर्थ लावला जाईल.