Bnss कलम ४६९ : शिक्षेचा भाग माफहोत नाही (व्यावृत्ती):

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४६९ :
शिक्षेचा भाग माफहोत नाही (व्यावृत्ती):
१) कोणतीही व्यक्ती आधीच्या किंवा नंतरच्या स्वत:च्या दोषसिद्धीअंती ज्या शिक्षेत पात्र झाली असेल तिचा कोणताही भाग कलम ४६६ किंवा कलम ४६७ मधील कोणत्याही गोष्टीमुळे तिला माफहोणार नाही.
२) जेव्हा द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यास भोगावयाची म्हणून दिलेली कारावासाची शिक्षा कारावासाच्या मुख्या शिक्षेस जोडलेली असेल व ती मुख्य शिक्षा भोगणाऱ्या व्यक्तीने त्या शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर आणखी एक व अनेक कारावासाच्या मुख्य शिक्षा भोगावयाच्या असतील तेव्हा, द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यास भोगावयाच्या कारावासाची शिक्षा ती व्यक्ती उपरोक्त एक वा अनेक पुढील मुख्य शिक्षा भोगीपर्यंत अमलात आणली जाणार नाही.

Leave a Reply