भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४६८ :
आरोपीने भोगलेल्या स्थानबद्धतेच्या कालावधीची कारावासाच्या शिक्षेतून वजावट करणे :
दोषसिद्धीअन्ती आरोपी व्यक्तीला काही मुदतीच्या कारावासाची शिक्षा द्रव्यदंड भरण्यात कसूर झाल्यामुळे भोगावयाच्या कारावासाची शिक्षा नव्हे ठोठावण्यात आली असेल तेव्हा, त्याच प्रकरणातील अन्वेषणाच्या, चौकशीच्या किांवा संपरीक्षेच्या काळात व अशा दोषसिद्धीच्या दिनांकापूर्वी त्याने जर काही स्थानबद्धता भोगली असेल तर त्या कालावधीची अशा दोषासिद्धअन्ती त्याला ठोठावण्यात आलेल्या कारावासाच्या मुदतीतून वजावट केली जाईल व त्याला ठोठावण्यात आलेल्या कारावासाच्या मुदतीपैकी जर काही मुदत राहिली तर दोषसिद्धपायीचा कारावास भोगण्याचे अशा व्यक्तीचे दायित्व तेवढ्यापुरते मर्यादित राहील :
परंतु असे की, कलम ४७५ मध्ये निर्दिष्ट केलेल्या प्रकरणात स्थानबद्धतेचा हा कालावधी त्या कलमामध्ये निर्दिष्ट केलेल्या चौदा वर्षांच्या कालावधीच्या बदल्यात निलेंखित करण्यात येईल.