Bnss कलम ४५८ : कारावासाच्या शिक्षेची अंमलबाजवणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४५८ :
कारावासाच्या शिक्षेची अंमलबाजवणी :
१) कलम ४५३ मध्ये ज्यांसाठी उपबंध केला आहे त्याहून अन्य खटल्यांमध्ये आरोपीला आजीव कारावासाची किंवा काही मुदतीच्या कारावासाची शिक्षा दिली जाईल तेव्हा, जेथे आरोपीला बंदिवासात ठेवले असेल किंवा ठेवावयाचे असेल अशा तुरूंगाकडे किंवा अन्य स्थळाकडे शिक्षा देणारे न्यायालय तत्काळ वॉरंट पाठवील व आरोपीला याप्रमाणे आधीच अशा तुरूंगात किंवा अन्य स्थळी बंदिवासात ठेवलेले नसेल तर त्याला वॉरंटासह अशा तुरूंगात किंवा अन्य स्थळी पाठवून देईल.
परंतु, आरोपीला न्यायालय उठेपर्यंत कारावासाची शिक्षा दिलेली असेल त्या बाबतीत, वॉरंट तयार करण्याची किंवा तुरूंगाकडे पाठवण्याची जरूरी असणार नाही व न्यायालय निदेशित करील अशा स्थळी आरोपीला बंदिवासात ठेवता येईल.
२) आरोपीला पोटकलम (१) मध्ये नमूद केलेली अशी कारावासाची शिक्षा देतेवेळी, तो न्यायालयात हजर नसेल त्या बाबतीत, न्यायालय त्याला जेथे बंदिवासात ठेवावयाचे त्या तुरूंगात किंवा त्या स्थळी पाठवण्यासाठी त्याच्या अटकेचे वॉरंट काढेल; व अशा बाबतीत, शिक्षा त्याच्या अटकेच्या दिनांकास सुरू होईल.

Leave a Reply