भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४५५ :
सर्वोच्च न्यायालयाकडे अपील होऊ शकत असल्यास मृत्युदंडाची अंमलबजावणी पुढे ढकलणे :
१) उच्च न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा दिली असेल व त्याच्या न्यायनिर्णयावर सर्वोच्च न्यायालयाकडे संविधानाच्या अनुच्छेद १३४-खंड (१) च्या उपखंड (a)(क) किंवा उपखंड (b)(ख) खाली अपील होऊ शकत असेल त्या बाबतीत, उच्च न्यायालय असे अपील करण्यासाठी दिलेला कालावधी संपेपर्यंत किंवा त्या कालावधीत अपील केले गेले तर अशा अपिलाचा निकाल केला जाईपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलण्याचा आदेश देईल.
२) उच्च न्यायालयाने मृत्यूची शिक्षा दिली असेल किंवा कायम केली असेल व जिला शिक्षा दिली त्या व्यक्तीने उच्च न्यायालयाकडे संविधानाच्या अनुच्छेद १३२ खाली किंवा अनुच्चछेद १३४ मधील खंड (१) च्या उपखंड (c)(ग) खाली प्रमाणपत्र दिले जाण्यासाठी अर्ज केला असेल त्या बाबतीत, उच्च न्यायालय अशा अर्जाचा निकाल करीपर्यंत किंवा जर अशा अर्जावरून प्रमाणपत्र दिले गेले तर असा, प्रमाणपत्रावरून सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करण्यासाठी दिलेला कालावधी संपेपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलण्याचा उच्च न्यायालय आदेश देईल.
३) उच्च न्यायालयाने मृत्यूची शिक्षा दिली असेल किंवा कायम केली असेल व जिला शिक्षा दिली त्या व्यक्तीचा, संविधानाच्या अनुच्छेद १३६ खाली अपिलासाठी विशेष अनुज्ञा दिली जाण्यासांी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंतीअर्ज सादर करण्याचा इरादा आहे अशी उच्च न्यायालयाची खाली झाली असेल त्या बाबतीत, ते असा विनंतीअर्ज सादर करणे त्या व्यक्तीला शक्य होण्यासाठी आपणास पुरेसा वाटेल इतका काळ शिक्षेची अंमलबाजवणी पुढे ढकल्याचा आदेश देईल.