भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ३४ :
शिक्षांची अंमलबजावणी, निलंबन – माफी आणि सौम्यीकरण :
(A)क) (अ) – मृत्युदंड :
कलम ४५३ :
कलम ४०९ खाली दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी :
जेव्हा मृत्युदंड कायम करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे सादर केलेल्या खटल्यात, उच्च न्यायालयाचा त्यावरील कायमीकरणाचा किंवा अन्य आदेश सत्र न्यायालयाला मिळेल तेव्हा, ते न्यायालय वॉरंट काढून किंवा जरूर ती अन्य उपाययोजना करून असा आदेश अमलात आणवील.