भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४५१ :
कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी खटले सोपवणे किंवा काढून घेणे :
कोणत्याही जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा उपविभागीय दंडाधिकाऱ्याला-
(a) क) (अ) आपणांपुढे सुरू झाली असेल अशी कोणतीही कार्यवाही निकालात काढण्यासाठी आपणांस दुय्यम असलेल्या कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडे ती सोपवता येईल;
(b) ख) (ब) आपणांस दुय्यम असलेल्या कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडून कोणताही खटला काढून घेता येईल किंवा आपण त्याच्याकडे सोपवला असेल असा कोणताही खटला परत मागवता येईल, आणि स्वत:च अशी कार्यवाही निकालात काढता येईल किंवा ती निकालात काढण्यासाठी अन्य कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडे निदेशित करता येईल.