Bnss कलम ४४४ : पक्षकारांचे म्हणणे ऐकण्याचा न्यायालयाचा विकल्पाधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४४४ :
पक्षकारांचे म्हणणे ऐकण्याचा न्यायालयाचा विकल्पाधिकार :
या संहितेने अन्यथा व्यक्तपणे उपबंधित केले असेल तेवढे वगळून एरव्ही, आपल्या पुनरीक्षण अधिकारांचा वापर करण्याऱ्या कोणत्याही न्यायालयासमोर कोणत्याही पक्षकाराला जातीनिशी किंवा वकिलामार्फ त आपले म्हणणे मांडण्याचा हक्क नाही; पण अशा अधिकारांचा वापर करताना स्वत:ला योग्य वाटल्यास ते न्यायालय कोणत्याही पक्षकाराने जातीनिशी किंवा वकिलामार्फ त मांडलेले म्हणणे ऐकून घेऊ शकेल.

Leave a Reply