Bnss कलम ४३ : अटक कशी करावयाची :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४३ :
अटक कशी करावयाची :
१) अटक करताना, तसे करणारा पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती, अटक करावयाच्य व्यक्तीने उक्तीद्वारे किंवा कृतीद्वारे स्वाधीन होण्याची तयारी दर्शविली नाही, तर, तिच्या शरीरास प्रत्यक्षपणे स्पर्श करील किंवा वेढा घालील :
परंतु, जेव्हा एखाद्या महिलेस अटक करावयाची असेल तेव्हा जर विरुद्ध परिस्थिती दिसून येत नसेल, तर अटकेबाबत केलेल्या तोंडी सूचनेवरुन तिने स्वाधीन होणे ही अटक असल्याचे गृहीत धरण्यात येईल आणि अन्यथा परिस्थितीवरुन अन्यकृती आवश्यक नसेल, तर किंवा पोलीस अधिकारी ही महिला नसेल, तर पोलीस अधिकारी महिलेस अटक करण्यासाठी तिला स्पर्श करणार नाही.
२) जर अशा व्यक्तीने आपणास अटक करावयाच्या प्रयत्नाचा बळाने प्रतिकार केला किंवा अटक चुकवण्याचा प्रयत्न केला तर, असा पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती, अटक करण्यासाठी जरुर त्या सर्व मार्गांचा अवलंब करु शकेल.
३) पोलिस अधिकारी, गुन्ह्याचे स्वरुप आरि गंभीरता लक्षात घेऊन, सवयीच्या, कोठडीतून पळून गेलेल्या, संघटित गुन्हाचा अपराध केलेल्या, यामध्ये दहशतीवादी कृत्य, अंमली पदार्थांशी संबंधित अपराध, शस्त्रे आणि दारुगोळा बेकायदेशीर बाळगरण्याचा अपराध, खून, बलात्कार, अ‍ॅसिड हल्ला, नाणी आणि चलनी नोटांची बनावट, मानवी तस्करी, मुलांवरील लैंगिक अपराध, राज्याविरुद्धचे अपराध, यांचा समावेश होतो, व्यक्तीला अटक करताना किंवा अशा व्यक्तीला न्यायालया समक्ष हजर करताना हातकडी वापरु शकेल.
४) या कलमातील कोणत्याही गोष्टीमुळे , मृत्यूच्या किंवा आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचा जिच्यावर आरोप नाही अशा व्यक्तीचा मृत्यू घडवून आणण्याचा हक्क मिळत नाही.
५) अपवादात्मक परिस्थिती खेरीज करुन कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी अटक करण्यात येणार नाही आणि जेथे अपवादात्मक परिस्थिती असेल अशा बाबतीत, महिला पोलीस अधिकारी लेखी निवेदन देऊन, ज्याच्या स्थानिक अधिकारीतेमध्ये अपराध करण्यात आला असेल किंवा अटक करावयाची असेल अशा प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेईल.

Leave a Reply