भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४३४ :
अपिलान्ती दिलेल्या न्यायनिर्णयांची व आदेशांची अंतिमता :
अपील न्यायालयाने अपिलान्ती दिलेली न्यायनिर्णय कलम ४१८, कलम ४१९ व कलम ४२५ चे पोटकलम (४) यामध्ये किंवा ३२ व्या प्रकरणामध्ये उपबंधित केलेल्या बाबी खेरीजकरून अन्य बाबतीत अंतिम असतील;
परंतु, कोणत्याही खटल्यातील दोषसिद्धीविरूद्ध करण्यात आलेल्या अपिलाचा अंतिम निकाल केलेला असला तरी,–
(a) क) (अ) कलम ४१९ खाली दोषमुक्तीविरूद्ध केलेल्या, त्याच खटल्यातून उद्भवणाऱ्या अपिलाची किंवा,
(b) ख) (ब) कलम ४१८ खाली शिक्षा वाढविण्यासाठी केलेल्या, त्याच खटल्यातून उद्भवणाऱ्या अपिलाची,
अपील न्यायालयाला गुणावगुणानुसार सुनावणी करता येईल व त्याचा निकाल करता येईल.
