Bnss कलम ४३३ : अपील न्यायालयातील न्यायाधीश मताच्या बाबतीत समसमान विभागले असतील तेव्हा प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४३३ :
अपील न्यायालयातील न्यायाधीश मताच्या बाबतीत समसमान विभागले असतील तेव्हा प्रक्रिया :
जेव्हा या प्रकरणाखालील अपिलाची सुनावणी उच्च न्यायालयाने काही न्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर केली असून, त्यांच्यात मतभेद झालेला असेल तेव्हा, त्यांच्या मतांसहित अपील त्या न्यायालयाच्या दुसऱ्या न्यायाधीशापुढे ठेवले जाईल, व तो न्यायाधीश स्वत:ला योग्य वाटेल अशा सुनावणीनंतर आपले मत देईल, व न्यायनिर्णय किंवा आदेश त्या मतानुसार होईल:
परंतु, जर न्यायपीठाच्या घटक-न्यायधीशांपैकी एका न्यायाधीशाने किंवा या कलमाखाली दुसऱ्या न्यायाधीशासमोर अपील ठेवलेले असेल तर त्या बाबतीत, त्या न्यायाधीशाने तसे आवश्यक केल्यास त्याहून मोठ्या न्यायापीठाकरवी अपिलाची ेरसुनावणी व निर्णय केला जाईल.

Leave a Reply