Bnss कलम ४३२ : अपील न्यायलय अधिक पुरावा घेऊ शकेल किंवा तो घेण्याचा आदेश देऊ शकेल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४३२ :
अपील न्यायलय अधिक पुरावा घेऊ शकेल किंवा तो घेण्याचा आदेश देऊ शकेल :
१) या प्रकरणाखाली कोणत्याही अपिलाचे काम पाहताना अपील न्यायालयाला अधिक पुराव्याची जरूरी वाटली तर, ते आपली कारणे नमूद करून स्वत: असा पुरावा घेऊ शकेल अथवा दंडाधिकाऱ्याने अगर अपील न्यायालय हे उच्च न्यायालय असेल तेव्हा सत्र न्यायालयाने किंवा दंडाधिकाऱ्याने तो पुरावा घ्यावा असा निदेश देऊ शकेल.
२) जेव्हा सत्र न्यायालय किंवा दंडाधिकारी अधिक पुरावा घेईल तेव्हा, ते किंवा तो असा पुरावा अपील न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठवील व तदनंतर असे न्यायालय अपिलाचा निकाल करण्याच्या कामास सुरूवात करील.
३) जेव्हा अधिक पुरावा घेण्यात येईल तेव्हा, आरोपीला किंवा त्याच्या वकिलाला उपस्थित राहाण्याचा हक्क असेल.
४) या कलमाखाली पुरावा घेण्याचे काम हे जणू काही चौकशी करण्याचे काम असावे त्याप्रमाणे ते २५ व्या प्रकरणाच्या उपबंधांस अधीन असेल.

Leave a Reply