भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४३१ :
दोषमुक्तीवरील अपिलाचे कामी आरोपीला अटक :
जेव्हा कलम ४१९ खाली अपील सादर केले जाईल तेव्हा, उच्च न्यायालय आरोपीला अटक करून आपणांपुढे किंवा कोणत्याही दुय्यम न्यायालयापुढे आणण्याचा निदेश देणारे वॉरंट काढू शकेल व ज्या न्यायालयापुढे त्याला आणले जाईल ते त्याला अपिलाचा निकाल होईपर्यंत कारागृहात पाठवू शकेल किंवा त्याला जामिनावर सोडू शकेल.