भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४२ :
सशस्त्र सेनादलांच्या सदस्यांना अटकेपासून संरक्षण :
१) कलम ३५ आणि कलम ३९ ते कलम ४१ (दोन्ही धरुन) यांत काहीही अंतर्भूत असले तरी केंद्र शासनाची संमती मिळविल्याखेरीज संघराज्याच्या सशस्त्र सेनादलांमधील कोणत्याही सदस्याला त्याने आपल्या पदाची कामे पार पाडण्याचे कामी केलेल्या किंवा त्यासाठी म्हणून केलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल अटक केली जाणार नाही.
२) राज्य शासन, अधिसूचनेद्वारे पोटकलम (१) चे उपबंध, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्याच्याकडे सोपविण्यात आली आहे अशा दलापैकी त्या अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा वर्गाच्या किंव प्रवर्गाच्या सदस्यांना- मग ते कुठेही सेवा करीत असोत-लागू होती असा निदेश देऊ शकेल, आणि त्यामुळे त्या पोटकलमाचे उपबंध, त्यात आलेल्या केंद्र शासन या शब्दप्रयोगाऐवजी जणू काही राज्य शासन हा शब्दप्रयोग घालण्यात आलेला असावा त्याप्रमाणे लागू होतील.