भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४२८ :
दुय्यम अपील न्यायालयाचे निर्णय :
२९ व्या प्रकरणामध्ये अंतर्भुत असलेल्या मूळ अधिकारितेच्या फौजदारी न्यायालयाच्या न्यायनिर्णयासंबंधीचे नियम, सत्र न्यायालयाने किंवा मुख्य न्याय दंडाधिाकऱ्याने अपिलांती दिलेल्या न्यायनिर्णयाला शक्य होईल तेथवर, लागू असतील:
परंतु, न्यायनिर्णय दिला जात असता तो ऐकण्यासाठी आरोपीला तेथे आणले जाणार नाही किंवा हजर राहण्यास फर्माविले जाणार नाही. मात्र अपील न्यायालयाने अन्य निदेश दिला तर गोष्ट वेगळी.