Bnss कलम ४२७ : अपील न्यायालयाचे अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४२७ :
अपील न्यायालयाचे अधिकार :
अशा अभिलेखाचे अवलोकन केल्यानंतर व अपीलकर्त्याचे किंवा त्याचा वकील उपस्थित राहिल्यास त्याचे व सरकारी अभियोक्ता उपस्थित राहिल्यास त्याचे आणि कलम ४१८ किंवा कलम ४१९ खालील अपिलाच्या बाबतीत आरोपी उपस्थित राहिल्यास त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जर, हस्तक्षेप करण्यास पुरेसे कारण नाही असे अपील न्यायालयाला वाटले तर, ते न्यायालय अपील खारीज करू शकेल अथवा,-
(a) क) (अ) दोषमुक्तीच्या आदेशावरील अपिलात, असा आदेश फिरवू शकेल व आणखी चौकशी करावी किंवा प्रकरणपरत्वे, आरोपीची पुन्हा संपरीक्षा करावी किंवा त्याला संपरीक्षा होईपावेतो हवालतीत ठेवावे असा निदेश देऊ शकेल किंवा त्याला दोषी ठरवून कायद्यानुसार शिक्षादेश देऊ शकेल;
(b) ख) (ब) दोषसिध्दीवरील अपिलात-
एक) निष्कर्ष व शिक्षादेश फिरवून आरोपीला दोषमुत करू शकेल किंवा विनादोषारोप सोडू शकेल अगर अशा अपील न्यायालयाला दुय्यम असलेल्या सक्षम अधिकारितेच्या न्यायालयाने त्याची पुन्हा संपरीक्षा करावी किंवा त्याला संपरीक्षेसाठी सुपूर्द करावे असा आदेश देऊ शकेल, अथवा
दोन) शिक्षादेश कायम ठेवून निष्कर्षात फेरबदल करू शकेल, अथवा
तीन) निष्कर्षात फेरबदल करून किंवा केल्याशिवाय, शिक्षेचे स्वरूप किंवा व्याप्ती यात अगर स्वरूप आणि व्याप्ती यात जेणेकरून ती शिक्षा वाढणार नाही अशा प्रकारे फेरबदल करू शकेल;
(c) ग) (क) शिक्षावाढीसाठी केलेल्या अपिलात,-
एक) निष्कर्ष व शिक्षादेश फिरवून आरोपीला दोषमुक्त करू शकेल किंवा विनादोषारोप सोडू शकेल अगर त्या अपराधाची संपरीक्षा करण्यास सक्षम असलेल्या न्यायालयाने आरोपीची पुन्हा संपरीक्षा करावी असा आदेश देऊ शकेल, अथवा
दोन) शिक्षादेश कायम ठेवून निष्कर्षात फेरबदल करू शकेल अथवा,
तीन) निष्कर्षात फेरबदल करून किंवा केल्याशिवाय, शिक्षेचे स्वरूप किंवा व्याप्ती यात अगर स्वरूप आणि व्याप्ती यात जेणेकरून शिक्षा वाढेल किंवा कमी होईल अशा प्रकार फफेरबदल करू शकेल;
(d) घ) (ड) अन्य कोणत्याही आदेशावरील अपिलात, अशा आदेशात फेरबदल करू शकेल किंवा तो फिरवू शकेल;
(e) ङ) (इ) न्याय्य किंवा योग्य असेल असे कोणतेही विशोधन अथवा कोणताही परिणामी किंवा आनुषंगिक आदेश देऊ शकेल :
परंतु, आरोपीला शिक्षावाढीविरूध्द कारण दाखवण्याची संधी मिळाल्याशिवाय ती शिक्षा याप्रामाणे वाढवली जाणार नाही :
परंतु आणखी असे की, अपील न्यायालय त्याच्या मते आरोपीने जो अपराध केला असेल त्याबद्दल अपीलाधीन आदेश किंवा शिक्षादेश देणारे न्यायालय जी शिक्षा देऊ शकले असते तीहून मोठी शिक्षा वाढवली जाणार नाही.

Leave a Reply