भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४२२ :
सत्र न्यायालयाकडे केलेल्या अपिलाची सुनावणी कशी केली जाते :
१) पोटकलम (२) च्या उपबंधाच्या अधीनतेने, सत्र न्यायाधीश किंवा सत्र न्यायधीशाकडे केलेल्या अपिलाची सुनावणी सत्र न्यायाधीश किंवा अपर सत्र न्यायाधीश करील.
परंतु , द्वितीय वर्ग दंडाधिकाऱ्याने केलेल्या संपरीक्षेत झालेल्या दोषसिध्दीविरुध्द केलेल्या अपिलाची सुनावणी व निकाल सहायक सत्र न्यायाधीशाला किंवा मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याला करता येईल .
२ ) अपर सत्र न्यायाधीश किंवा मुख्य न्याय दंडाधिकारी, हा त्या विभागांचा सत्र न्यायाधीश ,सर्वसाधारण किंवा विशेष आदेशांव्दारे त्याच्याकडे जी अपिले सोपवील अथवा उच्च न्यायालय त्याला ज्यांची सुनावणी करण्यास विशेष आदेशाव्दारे निदेश देईल अशाच अपिलांची सुनावणी करील.