Bnss कलम ४२० : उच्च न्यायालयाने केलेल्या दोषसिध्दी विरुध्द विवक्षित बाबतीत अपील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४२० :
उच्च न्यायालयाने केलेल्या दोषसिध्दी विरुध्द विवक्षित बाबतीत अपील :
जेव्हा उच्च न्यायालयाने अपिलांती आरोपाच्या दोषमुक्तीचा आदेश फिरवून त्याला सिध्ददोष ठरवले असेल व त्याला मृत्यूची किंवा आजीव कारावासाची अथवा दहा वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाची शिक्षा दिली असेल तेव्हा,त्याला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येईल.

Leave a Reply