भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४१७ :
क्षुल्लक खटल्यात अपील नाही :
कलम ४१५ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, पुढीलपैकी कोणत्याही बाबतीत म्हणजे-
(a) क) (अ) उच्च न्यायालय जास्तीत जास्त तीन महिने इतक्या मुदतीच्या कारावासाचा किंवा जास्तीत जास्त एक हजार रूपये इतक्या द्रव्यदंडाचा किंवा असा कारावास व द्रव्यदंड या दोन्हींचा शिक्षादेश देईल त्या बाबतीत:
(b) ख) (ब) सत्र न्यायालय जास्तीत जास्त तीन महिने इतक्या मुदतीच्या कारावासाचाच किंवा जास्तीत जास्त दोनशे रूपये इतक्या द्रव्यदंडाचाच किंवा असा कारावास व द्रव्यदंड या दोन्हींचा शिक्षादेश देईल त्या बाबतीत:
(c) ग) (क) प्रथम वर्ग दंडाधिकारी जास्तीत जास्त शंभर रूपये इतक्या द्रव्यदंडाचाच शिक्षादेश देईल त्या बाबतीत; किंवा
(d) घ) (ड) संक्षिप्त संपरीक्षा करण्यात आलेल्या खटल्यात, ते काम चालवण्यास कलम २८३ खाली अधिकार प्रदान करण्यात आलेला दंडाधिकारी जास्तीत जास्त दोनशे रूपये इतक्या द्रव्यदंडाचाच शिक्षादेश देईल त्या बाबतीत सिध्ददोष व्यक्तीला अपील करता येणार नाही.
परंतु, अशा शिक्षेला अन्य कोणतीही शिक्षा जोडलेली असेल तर, तिच्याविरूध्द अपील करता येईल, पण:
एक) आरोपी व्यक्तीने शांतता राखण्यासाठी जामीन द्यावा असा तिला आदेश दिलेला आहे; किंवा
दोन) द्रव्यदंडाचा भरणा करण्यात कसूर झाल्यास कारावास देण्याबद्दलचा निदेशा शिक्षादेशात समाविष्ट आहे; किंवा
तीन) त्या खटल्यात द्रव्यदंडाचे एकाहून अधिक आदेश दिलेले आहेत (जर लादलेल्या द्रव्यदंडाची एकूण रक्कम त्या खटल्याच्या बाबतीत यात यापूर्वी विनिर्दिष्ट केलेल्या रकमेहून अधिक नसेल तर),
एवढयाच कारणावरून अशा शिक्षेवर अपील करता येणार नाही.