Bnss कलम ४१६ : आरोपी आपण दोषी असल्याची कबुली देईल अशा विवक्षित प्रकरणी अपील नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४१६ :
आरोपी आपण दोषी असल्याची कबुली देईल अशा विवक्षित प्रकरणी अपील नाही :
कलम ४१५ मध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, आरोपी व्यक्तीने आपण दोषी असल्याची कबुली दिली असेल आणि अशी कबुली तिला सिध्ददोष ठरवण्यात आले असेल त्या बाबतीत,-
एक) दोषसिध्दी उच्च न्यायालयाने केली असेल तर; किंवा
दोन) दोषसिध्दी सत्र न्यायालयाने, प्रथम किंवा द्वितीय वर्ग दंडधिकाऱ्याने केली असेल तर, शिक्षेची व्याप्ती किंवा वैधता या बाबी खेरीजकरून, त्यावर अपील होणार नाही.

Leave a Reply