भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४१५ :
दोषसिध्दीविरूध्द अपील :
१) उच्च न्यायालयाने आपल्या असाधारण मूळ फौजदारी अधिकारितेत केलेल्या संपरीक्षेत सिध्ददोष ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येईल.
२) ज्या व्यक्तीला सत्र न्यायाधीशाने किंवा अपर सत्र न्यायाधीशाने केलेल्या संपरीक्षेत सिध्ददोष ठरवण्यात आले असेल अथवा ज्या व्यक्तीला अन्य कोणत्याही न्यायालयाने केलेल्या संपरीक्षेत सिध्ददोष ठरवण्यात आले असून, त्या संपरीक्षेत तिच्याविरूध्द किंवा त्याच संपरीक्षेत सिध्ददोष ठरवलेल्या अन्य एखाद्या व्यक्तीविरूध्द सात वर्षांहून अधिक कारावासाचा शिक्षादेश संमत केलेला असेल अशा कोणत्याही व्यक्तीला उच्च न्यायालयाकडे अपील करता येईल.
३) पोटकलम (२) मध्ये अन्यथा उपबंधित केले असेल तेवढे वगळून एरव्ही, –
(a) क) (अ) प्रथम वर्ग किंवा द्वितीय वर्ग दंडाधिकाऱ्याने केलेल्या संपरीक्षेत सिध्ददोष ठरवण्यात आलेल्या, किंवा
(b) ख) (ब) कलम ३६४ खाली शिक्षादेश देण्यात आलेल्या, किंवा
(c) ग) (क) जिच्याबाबत कोणत्याही दंडाधिकाऱ्याने कलम ४०१ खाली आदेश किांव शिक्षादेश दिलेला असेल अशा,
कोणत्याही व्यक्तीला सत्र न्यायालयाकडे अपील करता येईल.
४) जेव्हा भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ७० किंवा ७१ खाली सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल करण्यात आले असेल, तेव्हा ते अपील, अपील दाखल केल्याच्या तारखे पासून सहा महिन्यात निकालात काढण्यात येईल.