भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४१२ :
उच्च न्यायालयाकडे कायमीकरणासाठी सादर केलेल्या खटल्यातील प्रक्रिया :
मृत्यूचा शिक्षादेश कायम करण्याकरता सत्र न्यायालयाने उच्च न्यायालयाकडे सादर केलेल्या खटल्यांमध्ये, उच्च न्यायालयाने कायमीकरणाचा आदेश किंवा अन्य आदेश दिल्यानंतर उच्च न्यायालयाचा योग्य अधिकारी न्यायालयाच्या मोहोरेनिशी आणि आपल्या अधिकृत स्वाक्षरीने साक्षांकित केलेली त्या आदेशाची प्रत प्रत्यक्ष किंवा इलैक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे सत्र न्यायालयाकडे विनाविलंब पाठवील.