भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४१० :
कायमीकरणाच्या आदेशावर किंवा नवीन शिक्षादेशावर दोन न्यायाधीशांनी स्वाक्षरी करणे :
याप्रमाणे सादर करण्यात आलेल्या प्रत्येक खटल्यात, उच्च न्यायालयाने शिक्षादेश कायम करण्यासाठी द्यावयाचा आदेश किंवा कोणताही नवीन शिक्षादेश किंवा आदेश असे न्यायालय दोन किंवा अधिक न्यायाधीशांचे मिळून बनले असेल तेव्हा, त्यातील कमीत कमी दोघांकडून केला जाईल, संमत केला जाईल आणि स्वाक्षरित केला जाईल.