भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४०० :
बिनदखली प्रकरणात खर्च देण्याचा आदेश :
१) जेव्हा केव्हा न्यायालयाकडे कोणत्याही बिनदखली अपराधाची फिर्याद देण्यात आली असेल तेव्हा, न्यायालयाने आरोपीला सिध्ददोष ठरवले तर, ते त्याच्यावर लादलेल्या शिक्षेशिवाय आणखी, फिर्याददाराला खटल्याच्या कामी आलेला खर्च संपूर्णत: किंवा अंशत: आरोपीने त्याला द्यावा असा आदेश देऊ शकेल, आणि तो खर्च देण्यात कसूर झाल्यास, आरोपीने जास्तीत जास्त तीस दिवस इतक्या मुदतीचा साधा कारावास भोगावा असाही आदेश देऊ शकेल, आणि असा खर्चात न्यायालयाला वाजवी वाटेल त्याप्रमाणे आदेशिका-फी, साक्षीदार आणि वकिलाची फी यांबाबत आलेल्या कोणत्याही खर्चाचा समावेश असेल.
२) या कलमाखालील आदेश हा अपील न्यायालय व आपले पुनरीक्षणाचे अधिकार वापरणारे उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय काढू शकेल.