Bnss कलम ३९७ : पीडित व्यक्तीवर उपचार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३९७ :
पीडित व्यक्तीवर उपचार :
भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ७० किंवा कलम ७१ किंवा कलम १२४ किंवा लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (२०१२ चा ३२) याच्या कलम ४, कलम ६, कलम ८ किंवा कलम १० च्या कक्षेत येणाऱ्या कोणत्याही अपराधाच्या पीडित व्यक्तीला, सरकारी किंवा खासगी, केंद्रशासनाकडून चालविण्यात येणाऱ्या, राज्य शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या, स्थानिक मंडळांकडून चालविण्यात येणाऱ्या किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून चालविण्यात येणाऱ्या सर्व रूग्णालयांनी ताबडतोब प्रथमोपचार किंवा वैद्यकीय उपचार मोफत पुरवले पाहिजेत आणि अशा घटनेबद्दल पोलिसांना ताबडतोब कळवले पाहिजे.

Leave a Reply