भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३९० :
कलमे ३८३, ३८४, ३८८ आणि ३८९ खालील दोषसिध्दीविरूध्द अपिले :
१) या कलमात काहीही अंतर्भूत असले तरी, उच्च न्यायालयाहून अन्य न्यायालयाने कलम ३८३, कलम ३८४, कलम ३८८ किंवा कलम ३८९ खाली शिक्षा दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला, अशा न्यायालयात करण्यात आलेल्या हूकूमनाम्यांवर किंवा आदेशांवर ज्याच्याकडे अपिले होऊ शकतील त्या न्यायालयाकडे अपील करता येईल.
२) ३१ व्या प्रकरणाचे उपबंध या कलमाखालील अपिलांना लागू होण्याजोगे असतील तेथवर ते लागू होतील,आणि ज्याविरूध्द अपील करण्यात आले त्या निर्णयात अपील न्यायालयाला फेरबदल करता येईल किंवा तो फिरवाता येईल अथवा ती शिक्षा कमी करता येईल किंवा ती फिरवता येईल.
३) लघुवाद न्यायालयाने केलेल्या दोषसिध्दीवरील अपील ज्या सत्र- विभागात असे न्यायालय स्थित असेल त्या विभागाच्या सत्र न्यायालयाकडे होऊ शकेल.
४) कलम ३८६ खाली काढलेल्या निदेशाच्या आधारे दिवाणी न्यायालय मानल्या गेलेल्या कोणत्याही निबंधकाने किंवा उप निबंधकाने केलेल्या दोषसिध्दीवरील अपील ज्या सत्र-विभागात अशा निबंधकाचे किंवा उप निबंधकाचे कार्यालय स्थित असेल त्या विभागाच्या सत्र न्यायालयाकडे होऊ शकेल.