भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८ :
पूसतपास करतेवेळी आपल्या पसंतीच्या अधिवक्त्यास भेटण्याचा अटक केलेल्या व्यक्तीचा अधिकार :
जेव्हा कोणत्याही व्यक्तीस अटक केलेली असेल आणि पोलिसांद्वारे तिची पूसतपास करण्यात येत असेल तेव्हा अशी व्यक्ती पूसतपास दरम्यान – मग संपूर्ण पूसतपास पूर्ण झालेली असो किंवा नसो,- आपल्या पसंतीच्या अधिवक्त्यास भेटण्यास हक्कदार असेल.