Bnss कलम ३८७ : माफीपत्र सादर केल्यावर अपराध्याची विनादोषारोप सुटका :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८७ :
माफीपत्र सादर केल्यावर अपराध्याची विनादोषारोप सुटका :
एखाद्या व्यक्तीने जी कोणतीही गोष्ट करणे कायद्याने आवश्यक असेल ते करण्याला तिने नकार दिल्याबद्दल किंवा ते न केल्याबद्दल अथवा उद्देशपूर्वक अपमान केल्याबद्दल किंवा व्यत्यय आणल्याबद्दल जेव्हा कोणत्याही न्यायालयाने कलम ३८४ खाली तिला अपराधी म्हणून शिक्षापत्र ठरवलेले असेल अथवा कलम ३८५ खाली एखाद्या दंडाधिकाऱ्याकडे तिला संपरीक्षेसाठी पाठवलेले असेल तेव्हा, अशा न्यायालयाच्या आदेशाला किंवा मागणीला त्याने मान दिल्यास किंवा त्याच्या समाधानापुरेसे माफीपत्र सादर केल्यास, ते न्यायालय अपराध्याला विनादोषारोप सोडू शकेल किंवा शिक्षा माफकरू शकेल.

Leave a Reply