Bnss कलम ३८५ : कलम ३८४ खाली परामर्श घेऊ नये असे न्यायालयाला वाटत असेल त्याबाबतीत प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८५ :
कलम ३८४ खाली परामर्श घेऊ नये असे न्यायालयाला वाटत असेल त्याबाबतीत प्रक्रिया :
१) कलम ३८४ मध्ये निर्दिष्ट केलेल्यांपैकी आणि आपल्या नजरेस पडेल अशा प्रकारे किंवा आपल्या समक्ष घडलेला कोणताही अपराध केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला, तिने द्रव्यदंड भरण्यात कसूर केली नाही तरी कारावासात ठेवावे किंवा तिच्यावर दोनशे रूपयांहून अधिक द्रव्यदंड बसवावा असे जर कोणत्याही प्रकरणात न्यायालयाला वाटले अथवा ते प्रकरण कलम ३८४ खाली निकालात काढू नये असे जर अन्य कोणत्याही कारणामुळे अशा न्यायालयाला वाटले तर, यात यापूर्वी उपबंधित केल्यानुसार अपराधाची घटक तथ्ये व आरोपीचे कथन नमूद केल्यानंतर असे न्यायालय ते प्रकरण त्याची संपरीक्षा करण्याची अधिकारिता असलेल्या दंडाधिकाऱ्याकडे पाठवू शकेल आणि अशा दंडाधिकाऱ्यासमोर अशा व्यक्तीने उपस्थित राहण्यासाठी जामीन द्यावा असे फर्मावू शकेल, आणि पुरेसा जामीन देण्यात आला नाही तर, अशा व्यक्तीला अशा दंडाधिकाऱ्याकडे बंदोबस्तात पाठवील.
२) ज्या दंडाधिकाऱ्याकडे या कलमाखाली कोणतेही प्रकरण पाठवण्यात आले असेल तो दंडधिकारी ते प्रकरण जणू काही पोलीस अहवालावरून सुरू करण्यात आलेले असावे त्याप्रमाणे शक्य तेथवर त्या प्रकरणाचा परामर्श घेण्यास सुरूवात करील.

Leave a Reply