भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८२ :
दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्याची कार्यपध्दती :
१) कलम ३७९ किंवा कलम ३८० खाली ज्याच्यकडे फिर्याद देण्यात आली असेल तो दंडाधिकारी, १६ व्या प्रकरणात काहीही अंतर्भुत असले तरी, शक्य होईल तेथवर, ती फिर्याद जणू काही पोलीस अहवालावरून दाखल करण्यात आलेली असावी त्याप्रमाणे त्या प्रकरणाचा परामर्श घेण्यास सुरूवात करील.
२) ज्या न्यायिक कार्यवाहीतून ती बाब उद्भवलेली आहे तिच्यात झालेल्या निर्णयाविरूद्ध केलेले अपील प्रलंबित आहे असे अशा दंडाधिकाऱ्याच्या किंवा ज्याच्याकडे तो खटला वर्ग करण्यात आला असेल अशा अन्य कोणत्याही दंडाधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले जाईल त्या बाबतीत, तो, स्वत:ला योग्य वाटल्यास, खटला कोणत्याही टप्प्यात असताना,त्याची सुनावणी अशा अपिलाचा निर्णय होईपर्यंत तहकूब करू शकेल.