Bnss कलम ३८० : अपील :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८० :
अपील :
१) ज्या व्यक्तीच्या अर्जावरून उच्च न्यायालयाहून अन्य कोणत्याही न्यायालयाने कलम ३७९ च्या पोटकलम (१) किंवा पोटकलम (२) खाली फिर्याद देण्यास नकार दिला असेल अथवा अशा न्यायालयाने जिच्याविरूध्द अशी फिर्याद दिली असेल अशा कोणत्याही व्यक्तीला असे पूर्वोक्त न्यायालय कलम २१५ पोटकलम (४) च्या अर्थानुसार ज्या न्यायालयाला दुय्यम असेल त्याच्यकडे अपील करता येईल, आणि तदनंतर संबंधित पक्षांना नोटीस देऊन, ते वरिष्ठ न्यायालय फिर्याद मागे घेण्याचा अथवा, प्रकरणपरत्वे, कलम ३७९ खाली असे पूर्वोक्त न्यायालय जी फिर्याद देऊ शकेल असते ती देण्याचा निदेश देऊ शकेल, आणि जर त्याने अशी फिर्याद दिली तर, त्या कलमाचे उपबंध तदनुसार लागू होतील.
२) या कलमाखालील आदेश, आणि अशा कोणत्याही आदेशाचय अधीनतेने, कलम ३७९ खालील आदेश अंतिम असतील, पुनरीक्षणास पात्र असणार नाहीत.

Leave a Reply