Bnss कलम ३७७ : अडकवून ठेवलेली मनोविकल व्यक्ती सोडून देण्यायोग्य असेल तेव्हाची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३७७ :
अडकवून ठेवलेली मनोविकल व्यक्ती सोडून देण्यायोग्य असेल तेव्हाची प्रक्रिया :
१) जर कोणत्याही व्यक्तीला कलम ३६९ च्या पोटकलम (२) खाली किंवा कलम ३७४ खाली अडकवून ठेवलेले असेल, आणि महानिरीक्षकांनी किंवा वीक्षकांनी (अभ्यागत) आपल्या मते त्या व्यक्तीला सोडून दिल्याने ती व्यक्ती स्वत:ला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला इजा पोचवील असा धोका नाही असे प्रमाणित केले तर, त्यावरून राज्य शासन तिला सोडून देण्याचा किंवा हवालतीत अडकवून ठेवण्याचा किंवा आधीच तिला सार्वजनिक मानसिक आरोग्य आस्थापनात पाठवले नसल्यास, अशा आस्थापनात पाठवून देण्याचा आदेश देऊ शकेल; आणि तिला एखाद्या सार्वजनिक मानसिक आरोग्य आस्थापनात पाठवून देण्याचा त्याने आदेश दिल्यास ते एक न्यायिक व दोन वैद्यकीय अशा अधिकाऱ्यांनी बनलेल्या एखाद्या आयोगाची नियुक्ती करू शकेल.
२) असा आयोग अशा व्यक्तीच्या मानसिक अवस्थेबाबत रीतसर चौकशी करील, जरूर तो साक्षीपुरावा घेईल, आणि राज्य शासनाला अहवाल देईल व मग ते शासन स्वत:ला योग्य वाटेल त्याप्रमाणे त्या व्यक्तीला सोडून देण्याचा किंवा अडकवून ठेवण्याचा आदेश देऊ शकेल.

Leave a Reply