भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३७४ :
मनोविकलते च्या आधारावर दोषमुक्त केलेल्या व्यक्तीला सुरक्षित हवालतीत स्थानबध्द करावयाचे :
१) आरोपी व्यक्तीने अभिकथित कृत्य केलेले आहे असा निष्कर्ष नमूद केला जाईल तेव्हा, ज्याच्यासमोर संपरीक्षा झाली असेल तो दंडाधिकारी किंवा ते न्यायालय, असे कृत्य अक्षमता आढळून आली नसती तर अपराध ठरले असते अशा स्वरूपाचे असेल तर,
(a) क) (अ) दंडाधिकाऱ्याला किंवा न्यायालयाला योग्य वाटेल अशा स्थळी व अशा रीतीने त्या व्यक्तीला सुरक्षित हवालतीत स्थानबध्द करण्याचा आदेश देईल; किंवा
(b) ख) (ब) अशा व्यक्तीला तिच्या एखाद्या नातलगाच्या किंवा मित्राच्या स्वाधीन करण्याचा आदेश देईल.
२) आरोपीला पोटकलम (१) च्या खंड (a)(क) (अ) खाली लोक मानसिक स्वास्थ्य स्थापनात अडकवून ठेवण्याचा आदेश मानसिक स्वास्थ्य अधिनियम २०१७ (२०१७ चा १०) याखाली राज्य शासनाने केलेले असतील अशा नियमांना अनुसरल्याशिवाय अन्यथा देण्यात येणार नाही.
३) पोटकलम (१) च्या खंड (b)(ख) (ब) खाली आरोपीला नातलगाच्या किंवा मित्राच्या हवाली करण्याचा आदेश द्यावयाचा असल्यास अशा नातलगाने किंवा मित्राने अर्ज केल्याखेरीज आणि,
(a) क) (अ) हवाली केल्या जाणाऱ्या व्यक्तीची यथायोग्य काळजी घेतली जावी आणि स्वत:ला किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीला इजा पोचवण्यास तिला प्रतिबंध व्हावा यासाठी :
(b) ख) (ब) राज्य शासन निदेशित करील त्या अधिकाऱ्यासमोर आणि त्या त्या वेळी व स्थळी निरीक्षणासाठी तिला हजर केले जावे यासाठी,
दंडाधिकाऱ्याला किंवा न्यायालयाला समाधानकारक वाटेल असा जामीन त्याने दिल्याखेरीज,असा कोणताही आदेश दिला जाणार नाही.
४) दंडाधिकारी किंवा न्यायालय पोटकलम (१) खाली केलेली कारवाई राज्य शासनाला कळवील.