भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३७२ :
आरोपी निकोप (स्वस्थचित्त) मनाचा दिसून येईल तेव्हा :
जेव्हा चौकशीच्या किंवा संपरीक्षेच्या वेळी आरोपी निकोप मनाचा असल्याचे दिसून येईल आणि आरोपीने केलेले कृत्य ते करतेवेळी तो निकोप मनाचा असता तर अपराध ठरले असते आणि कृत्य घडले त्या वेळी तो त्या कृत्याचे स्वरूप काय आहे किंवा ते गैर आहे किंवा कायद्याच्या विरोधी कृत्य आहे हे जाणण्यास मनोविकलतेमुळे अक्षम होता असे समजण्यास कारण आहे याबद्दल, आपणासमोर देण्यात आलेल्या साक्षीपुराव्यावरून दंडाधिकाऱ्यांची खात्री होईल तेव्हा, दंडाधिकारी खटला पुढे चालू करील आणि सत्र न्यायाधीशाने आरोपीची संपरीक्षा करणे योग्य असेल तर, त्याला संपरीक्षेसाठी सत्र न्यायालयाकडे सुपूर्द करील.