Bnss कलम ३७१ : आरोपी न्यायाधीशासमोर हजर झाल्यावरची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३७१ :
आरोपी न्यायाधीशासमोर हजर झाल्यावरची प्रक्रिया :
१) आरोपी दंडाधिकाऱ्यासमोर किंवा न्यायालयासमोर उपस्थित झाल्यावर अथवा आरोपीला आपल्यासमोर आणल्यावर दंडाधिकाऱ्यास किंवा न्यायालयास, तो स्वत:चा बचाव करण्यास क्षम आहे असे वाटले तर, चौकशी किंवा संपरीक्षा पुढे चालू होईल.
२) आरोपी स्वत:चा बचाव करण्यास अजूनही अक्षम आहे असे दंडाधिकाऱ्यास किंवा न्यायालयास वाटले तर, दंडाधिकारी किंवा न्यायालय कलम ३६७ किंवा, प्रकरणपरत्वे, कलम ३६८ च्या उपबंधानुसार कृती करील आणि जर आरोपी मनोविकलतेने ग्रस्त आहे व त्यामुळे स्वत:चा बचाव करण्यास अक्षम असल्याचे आढळून आले तर, कलम ३६९ च्या उपबंधानुसार अशा आरोपीबाबत कार्यवाही करील.

Leave a Reply