भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३६ :
अटकेची कार्यपद्धती व अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची कर्तव्ये :
अटक करतेवेळी, प्रत्येक पोलीस अधिकारी-
(a) क) (अ) ज्यामुळे सहज ओळख पटविणे शक्य होईल अशा प्रकारे तिच्या नावाची अचूक, दृश्य व स्पष्ट ओळख धारण करील;
(b) ख) (ब) अटक ज्ञापन तयार करील व त्यावर,-
एक) ज्या व्यक्तीस अटक केलेली आहे त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असलेली व्यक्ती असेल किंवा ज्या ठिकाणी अटक करण्यात आली असेल त्या ठिकाणची एखादी प्रतिष्ठित व्यक्ती असेल, अशा किमान एका साक्षीदाराची सही घेण्यात येईल;
दोन) अटक केलेल्या व्यक्तीची प्रतिस्वाक्षरी घेण्यात येईल, आणि
(c) ग) (क) अटक केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याने ज्ञापनावर साक्षंकन केलेले नसेल, तर त्याच्या अटकेची माहिती देण्यासाठी तिच्या एखाद्या नातेवाईकाचे किंवा मित्राचे किंवा कोणत्याही इतर व्यक्तीचे नाव देण्याचा त्याला हक्क आहे, याबाबत अटक केलेल्या व्यक्तीस माहिती देईल.