भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३५९ :
अपराध आपसात मिटविणे :
१) पुढे दिलेल्या तक्त्याच्या पहिल्या दोन स्तंभात भारतीय न्याय संहिता २०२३ यातील कलमांखाली शिक्षापात्र असलेले जे अपराध विनिर्दिष्ट केले आहेत. ते त्या तक्त्याच्या तिसऱ्या स्तंभात नमूद केलेल्या व्यक्तिंना आपसात मिटवता येतील :
तक्ता (सारणी ) :
———-
अपराध (१) :
गुन्हेगारी उद्देशाने विवाहित स्त्रीस भूरळ पाडून नेणे, किंवा पळवून नेणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
८४
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
त्या स्त्रीचा पती व स्त्री.
——————
अपराध (१) :
इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) : ११५ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या व्यक्तिला दुखापत पोहोचविण्यात आली असेल ती व्यक्ति.
——————
अपराध (१) : इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) : ११३ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) : ज्या व्यक्तिला दुखापत पोहोचविण्यात आली असेल ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
प्रक्षोभकारणांमुळे इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
१२२ (१)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या व्यक्तिला दुखापत पोहोचविण्यात आली असेल ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
गंभीर व आकस्मिक प्रक्षोभकारणांमुळे इच्छापूर्वक जबर दुखापर पोहोचविणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
१२२ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या व्यक्तिला दुखापत पोहोचविण्यात आली असेल ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
कोणत्याही व्यक्तिस गैरपणे निरुद्ध किंवा परिरुद्ध करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
१२६ (२), १२७ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
निरुद्ध किंवा परिरुद्ध केलेली व्यक्ति
——————
अपराध (१) :
एखाद्या व्यक्तिला तीन दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरपणे परिरुद्ध करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
१२७ (३)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
परिरुद्ध केलेली व्यक्ति
——————
अपराध (१) :
एखाद्या व्यक्तिला दहा दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरपणे परिरुद्ध करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
१२७ (४)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
परिरुद्ध केलेली व्यक्ति
——————
अपराध (१) :
एखाद्या व्यक्तिला गुप्तस्थळी परिरुद्ध करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
१२७ (६)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
परिरुद्ध केलेली व्यक्ति
——————
अपराध (१) :
हमला करणे किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
१३१, १३३, १३६
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
जिच्यावर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग केला गेला ती व्यक्ति
——————
अपराध (१) :
कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखवण्याच्या बुध्दिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे इत्यादी.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३०२
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
जिच्या धार्मिक भावना दुखावणे अभिप्रेत असेल ती व्यक्ती.
——————
अपराध (१) :
चोरी
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३०३ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
चोरलेल्या संपत्ती किंवा मालमत्तेचा मालक
——————
अपराध (१) :
मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३१४
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
अपहार केलेल्या मालमत्तेचा मालक
——————
अपराध (१) :
परिवाहक, मालधक्कावाला, इत्यादींनी केलेला फौजदारीपात्र न्यासभंग
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३१६ (३)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) : न्यासभंग करण्यात आलेल्या मालमत्तेचा किंवा संपत्तीचा मालक
——————
अपराध (१) :
चोरीची मालमत्ता असल्याचे माहीत असून देखील अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता स्वीकारणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३१७ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
चोरलेल्या मालमत्तेचा किंवा संपत्तीचा मालक
——————
अपराध (१) :
चोरीची मालमत्ता असल्याचे माहीत असून देखील अप्रामाणिकपणे चोरीची मालमत्ता लपविण्यामध्ये किंवा तिची विल्हेवाट लावण्यामध्ये सहाय्य करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३१७ (५)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
चोरलेल्या मालमत्तेचा किंवा संपत्तीचा मालक
——————
अपराध (१) :
ठकवणूक (छल)
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३१८ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ठकवणूक झालेली व्यक्ति
——————
अपराध (१) :
तोतयेगिरी करुन ठकवणूक करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३१९ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ठकवणूक झालेली व्यक्ति
——————
अपराध (१) :
मालमत्तेचे धनकोंमध्ये वाटप करण्यात प्रतिबंध करण्यासाठी मालमत्ता , इत्यादी कपटीपणाने हलविणे किंवा लपविणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३२०
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
त्यामुळे बाधित झालेले धनको.
——————
अपराध (१) :
अपराध्यांस येणे असलेले ऋण किंवा रक्कम त्यांच्या धनकोला उपलब्ध होऊ देण्यास कपटीपणाने प्रतिबंध करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३२१
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
त्यामुळे बाधित झालेले धनको.
——————
अपराध (१) :
प्रतिफलाचे खोटे कथन अंतर्भूत असलेले हस्तांतरण पत्र कपटीपणाने निष्पादित करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३२२
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
त्यामुळे बाधित झालेली व्यक्ति
——————
अपराध (१) :
मालमत्ता कपटीपणाने काढून घेणे किंवा लपवून ठेवणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३२१
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
त्यामुळे बाधित झालेली व्यक्ति
——————
अपराध (१) :
आगळिक (रिष्टी) जेव्हा घडून आलेली हानी किंवा नुकसान ही, फक्त खासगी व्यक्तिचीच हानी किंवा नुकसान असेल तेव्हा
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३२४ (२), ३२४ (४)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या व्यक्तिची हानी किंवा नुकसान झाले असेल ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
जनावरांस ठार मारून किंवा विकलांग करुन आगळिक (रिष्टि) करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३२५
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
जनावरांचा मालक.
——————
अपराध (१) :
शेतकी प्रयोजने, इत्यादी करिता लागणाऱ्या पाण्याचा पुरवठा जेणे करुन कमी होई अशा प्रकारे आगळीक करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) : ३२६ (क)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
तो व्यक्ती, ज्याचे हानि किंवा नुकसान झाले आहे.
——————
अपराध (१) :
फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३२९ (३)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
वह व्यक्ति जिसके कब्जे में ऐसी सम्पत्ति है, जिस पर अतिचार किया गया है
——————
अपराध (१) :
गृह-अतिक्रमण
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३२९ (४)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
वह व्यक्ति जिसके कब्जे में ऐसी सम्पत्ति है, जिस पर अतिचार किया गया है
——————
अपराध (१) :
कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला (चोरीहून अन्य) अपराध करण्यासाठी केलेले गृह-अतिक्रमण
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३३२ (ग)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
अतिक्रमण झालेल्या घराचा कब्जा ज्या व्यक्तिकडे असेल ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
खोटे व्यापार चिन्ह किंवा स्वामित्व चिन्ह वापरणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३४५ (३)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
अशा वापरामुळे ज्या व्यक्तिची हानी किंवा नुकसान झाले ती व्यक्ति
——————
अपराध (१) :
दुसऱ्याने वापरले असेल तशाच व्यापार चिन्हाची किंवा स्वामित्व चिन्हाची नक्कल करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३४७ (१)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
अशा वापरामुळे ज्या व्यक्तिची हानी किंवा नुकसान झाले ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
नकली स्वामित्व चिन्हे अंकित असलेल्या मालाची विक्रिसाठी करणे किंवा तो विक्रीसाठी मांडणे किंवा निर्मितीसाठी जवळ बाळगणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३४९
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
अशा वापरामुळे ज्या व्यक्तिची हानी किंवा नुकसान झाले ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
फौजदारीपात्र धाकदपटशा
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३५१(२), ३५१(३)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
धाकदपटशा दाखवलेली व्यक्ती.
——————
अपराध (१) :
एखादी व्यक्ति दैवी प्रकोपाचा विषय होईल असा तिचा समज करुन देऊन घडलेली कृती.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३५४
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
जिच्याबाबतीत समज करुन (उत्प्रेरित) दिला ती व्यक्ति.)
——————
अपराध (१) :
पोटकलम (२) खाली तक्ता स्तंभ (१) मध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ३५६(२) समोर यथाविनिर्दिष्ट अशा प्रकरणांशिवाय मानहानि.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३५६ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
अब्रुनुकसान झालेली व्यक्ति.
——————
अपराध (१) :
अबु्रनुकसानीकारण (मानहानि) असल्याचे माहित असलेले साहित्य छापणे किंवा कोरणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३५६ (३)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
अब्रुनुकसान झालेली व्यक्ति.
——————
अपराध (१) :
अबु्रनुकसानीकारण (मानहानि) साहित्य अंतर्भूत असलेला छापील किंवा कोरीव पदार्थ त्यात तसे साहित्य असल्याचे माहित असताना विकणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३५६ (४)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
अब्रुनुकसान झालेली व्यक्ति.
——————
अपराध (१) :
आपराधिक सेवा संविदा भंग
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३५७
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
अपराध्याने ज्या व्यक्तीबरोबर संविदा केली ती व्यक्ती.
——————
२) पुढे दिलेल्या तक्त्याच्या पहिल्या दोन स्तंभात भारतीय न्याय संहिता २०२३ यातील कलमांखाली शिक्षापात्र असलेले जे अपराध विनिर्दिष्ट केले आहेत ते, अशा अपराधांची संपरीक्षा ज्या न्यायालयासमोर प्रलंबित असेल त्याच्या परवानगीने, त्या तक्त्याच्या तिसऱ्या स्तंभात नमूद केलेल्या व्यक्तिंना आपसात मिटविता येतील :-
——————
तक्ता (सारणी ) :
——————
अपराध (१) :
स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने कोणताही शब्द उच्चारणे किंवा कोणताही हावभाव करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
७९
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
जिचा विनयभंग करण्याचा उद्देश होता किंवा जिच्या एकांतपणाचा भंग झाला ती स्त्री.
——————
अपराध (१) :
पती किंवा पत्नी हयात असतानाच्या काळात पुन्हा विवाह करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
८२ (१)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
असा विवाह करणाऱ्या व्यक्तिचा पती किंवा पत्नी
——————
अपराध (१) :
गर्भस्त्राव (गर्भपात) घडवून आणणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
८८
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या व्यक्तिचा गर्भस्त्राव (गर्भपात) घडून आला ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
११७ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या व्यक्तिला दुखापत पोहचविण्यात आली ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणाने व हयगयीने एखादी कृती करुन दुखापत पोहचविणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
१२५ (a)(क) (अ)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या व्यक्तिला दुखापत पोहचविण्यात आली ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
मानवी जीवित किंवा इतरांची व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात येईल इतक्या बेदरकारपणाने व हयगयीने एखादी कृती करुन जबर दुखापत पोहचविणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
१२५ (b)(ख) (ब)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या व्यक्तिला दुखापत पोहचविण्यात आली ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
एखाद्या व्यक्तिला गैरपणे परिरुद्ध करण्याचा प्रयत्न करताना हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
१३५
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या व्यक्तिवर हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग केला ती व्यक्ति.
——————
अपराध (१) :
कारकुनाने किंवा चाकराने मालकाच्या कब्जातील मालमत्तेची चोरी करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३०६
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
चोरीच्या मालमत्तेचा मालक.
——————
अपराध (१) :
फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३१६ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या मालमत्तेबाबत न्यासभंग करण्यात आला असेल तिचा मालक.
——————
अपराध (१) :
कारकुनाने किंवा चाकराने केलेला फौजदारीपात्र (आपराधिक) न्यासभंग.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३१६ (४)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ज्या मालमत्तेबाबत न्यासभंग करण्यात आला असेल तिचा मालक.
——————
अपराध (१) :
ज्या व्यक्तिच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यास अपराधी विधित: किंवा वैध संविदेनुसार बद्ध होता त्या व्यक्तिला ठकवणे (फसवणे).
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३१८ (३)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ठकवणूक झालेली व्यक्ति
——————
अपराध (१) :
ठकवणूक करणे आणि मालमत्तेची सुपूर्दगी करण्यास अथवा मूल्यवान रोखा बनवण्यास, त्यात फेरबदल करण्यास किंवा तो नष्ट करण्यास अप्रामाणिकपणे प्रवृत्त करणे.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३१८ (४)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
ठकवणूक झालेली व्यक्ति
——————
अपराध (१) :
राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती किंवा राज्याचा राज्यपाल किंवा संघ राज्यक्षेत्राचा प्रशासक किंवा एखादा मंत्री याने आपली सरकारी कार्ये पार पाडताना केलेल्या वर्तनाबाबत त्याची अब्रुनुकसानी सरकारी अभियोक्त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन कार्यवाही सुरु झाली असता.
भारतीय न्याय संहितचे लागू असलेले कलम (२) :
३५६ (२)
ज्या व्यक्तिला अपराध मिटवता येईल ती व्यक्ति (३) :
अबु्रनुकसानी झालेली व्यक्ति.
——————
३) जेव्हा या कलमाखाली कोणताही अपराध आपसात मिटवण्यासारखा असेल तेव्हा, अशा अपराधास अपप्रेरणा देणे किंवा असा अपराध करण्याचा प्रयत्न करणे (जेव्हा असा प्रयत्न हाच अपराध असेल तेव्हा) किंवा आरोपी व्यक्ती, भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ३ च्या पोटकलम (५) किंवा १९० अन्वये पात्र असेल तेव्हा, त्याच रीतीने आपआपसात मिटवता येईल.
४) (a)क) (अ)जी व्यक्ती या कलमाखाली अपराध मिटवण्यास अन्यथा सक्षम होऊ शकेल ती बालक असेल अथवा मनोविकल असेल तेव्हा, तिच्या वतीन संविदा करण्यास सक्षम असलेल्या कोणत्याही व्यक्तीला न्यायालयाच्या परवानगीने असा अपराध आपसात मिटवता येईल.
(b)ख) (ब) जी व्यक्ती या कलमाखाली अपराध मिटवण्यास अन्यथा सक्षम होऊ शकेल ती व्यक्ती मरण पावल्यावर दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५ ) यामध्ये व्याख्या केल्याप्रमाणे अशा व्यक्तीचा जो वैध प्रतिनिधी असेल त्याला न्यायालयाच्या संमतीने अपराध आपसात मिटवता येईल.
५) जेव्हा आरोपीला संपरीक्षा हाईपावेतो हवालतीत ठेवण्यात आले असेल किंवा त्याला सिध्ददोष ठरवण्यात आले असून अपील प्रलंबित असेल तेव्हा, ज्याच्याकडे संपरीक्षसाठी त्याला पाठवण्यात आले असेल किंवा, प्रकरणपरत्वे, ज्याच्यापुढे अशा अपिलाची सुनावणी व्हावयाची असेल त्या न्यायालयाच्या अनुज्ञेशिवाय अपराध आपसात मिटवू दिला जाणार नाही.
६) कलम ४४२ खालील पुनरीक्षणाच्या आपल्या अधिकारांचा वापर करणारे उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय कोणत्याही व्यक्तीला, या कलमाखाली जो कोणताही अपराध आपसात मिटवण्यास अशी व्यक्ती सक्षम असेल तो मिटवण्यास मुभा देऊ शकेल.
७) जर कोणत्याही अपराधाबद्दल आरोपी पूर्व दोषसिध्दीच्या कारणामुळे वाढीव शिक्षेस किंवा निराळ्या प्रकारच्या शिक्षेस पात्र असेल तर, असा अपराध आपसात मिटवता येणार नाही.
८) या कलमाखाली केलेली अपराधाची मिटवणूक ही ज्याच्याबरोबर अपराध आपसात मिटवला त्या आरोपीची दोषमक्ती झाल्यासारखीचे परिणामकारक असेल.
९) या कलमाद्वारे उपबंधित केलेले असेल तसे खेरीजकरून अन्यथा कोणताही अपराध आपसात मिटवता येणार नाही.