Bnss कलम ३४ : गावाच्या कारभारासंबंधात नेमलेल्या अधिकाऱ्यांनी विवक्षित अहवाल देणे हे त्यांचे कर्तव्य :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३४ :
गावाच्या कारभारासंबंधात नेमलेल्या अधिकाऱ्यांनी विवक्षित अहवाल देणे हे त्यांचे कर्तव्य :
१) एखाद्या गावाच्या कारभारासंबंधात नियुक्त केलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने आणि गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पुढील बाबींसंबंधात आपणांकडे जी कोणतीही माहिती गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पुढील बाबींसंबंधात आपणांकडे जी कोणतीही माहिती असेल ती सर्वांत जवळचा दंडाधिकारी किंवा सर्वांत जवळच्या पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी, यांपैकी जो अधिक जवळ असेल त्याला तात्काळ कळवली पाहिजे, त्याबाबी अशा :-
(a) क) (अ) चोरीची मालमत्ता स्वीकारणारा किंवा विकणारा म्हणून कुप्रसिध्द असलेल्या कोणत्याही इसमाचा अशा गाावात किंवा त्याच्या जवळपास कायमचा किंवा तात्पुरता रहिवाशी;
(b) ख) (ब) जो इसम जबरी चोर, पळून गेलेला सिध्ददोषी किंवा उद्घोषित अपराधी असल्याचे आपणांस माहीत आहे किंवा तसा आपणांस वाजवी संशय आहे अशा कोणत्याही इसमाचा अशा गावातील कोणत्याही स्थळी असणारा राबता किंवा त्या गावातून होणारे त्याचे मार्गक्रमण;
(c) ग) (क) अशा गावात किंवा त्याच्या जवळपास कोणताी बिनजामिनी अपराध किंवा भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम १८९ आणि कलम १९१ खाली शिक्षापात्र असलेला कोणताही अपराध घडणे किंवा करण्याचा उद्देश असणे;
(d) घ) (ड) अशा गाावात किंवा त्याच्या जवळपास कोणताही आकस्मित किंवा अनैसर्गिक मृत्यू घडून येणे किंवा संशयास्पद परिस्थितीत कोणताही मृत्यू घडून येणे अथवा तसा मृत्यू घडून आलेला आहे असा वाजवी संशय जीमुळे उत्पन्न होतो अशा परिस्थितीत कोणताही मृतदेह किंवा त्याचा भाग सापडणे अथवा कोणतीही व्यक्ती अशा व्यक्तीच्याबाबत बिनजामिनी अपराध करण्यात आलेला आहे असा जीमुळे संशय उत्पन्न होतो अशा परिस्थितीत अशा गावातून नाहीशी होणे;
(e) ङ) (इ) जी कृती भारतात केली तर भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या पुढीलपैकी म्हणजेच कलम १०३, कलम १०५, कलम १११, कलम ११२, कलम ११३, कलम १७८ ते कलम १८१ (दोन्ही धरुन), कलम ३०५, कलम ३०७, कलम ३०९ ते कलम ३१२ (दोन्ही धरुन), कलम ३२६ चा खंड (च) (f)आणि खंड (छ) (g), कलम ३३१ किंवा कलम ३३२ यांपैकी कोणत्याही कलमाखाली शिक्षापात्र होईल अशी कोणतीही कृती भारताबाहेर अशा गाावाच्या जवळपास घडणे किंवा करण्याचा उद्देश असणे;
(f) च) (फ) सुव्यवस्था राखणे किंवा गुन्हगारीस प्रतिबंध करणे अथवा व्यक्ती किंवा मालमत्ता सुरक्षित राहणे यांना बाधक होण्याचा संभव असलेल्या ज्या बाबीसंबंधी जिल्हा दंडाधिकाऱ्याने राज्य शासनाच्या पूर्वमंजुरीने दिलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे वर्दी कळविण्याचे निदेशित केले असेल अशी कोणतीही बाब.
२) या कलमात,
एक) गाव या संज्ञेत गाव-जमिनींचा समावेश आहे;
दोन) उद्घोषित अपराधी या शब्दप्रयोगात ज्यांवर या संहितेचा विस्तार आहे त्या राज्यक्षेत्रांमध्ये जी कृती केल्यास, भारतीय न्याय संहिता २०२३ याअन्वये दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कारावास किंवा आजीवन कारावास किंवा मृत्युच्या शिक्षेस पात्र अपराध होईल अशा कोणत्याही कृतीबाबत भारतातील ज्या कोणत्याही राज्यक्षेत्रावर या संहितेचा विस्तार नाही. त्यातील कोणत्याही न्यायालयाने किंवा प्राधिकरणाने अपराधी म्हणून उद्घोषित केलेल्या कोणत्याही व्यक्तीचा आहे;
तीन) गावाच्या कारभारासंबंधात नेमलेला अधिकारी या शब्दांचा अर्थ ग्रामपंचायतीचा सदस्य असा आहे आणि त्यात ग्राम-प्रमुख व गावाच्या प्रशासनाशी संबंधित असे कोणतेही कार्य करण्यासाठी नियुक्त केलेला प्रत्येक अधिकारी किंवा अन्य व्यक्ती यांचा समावेश आहे.

Leave a Reply