Bnss कलम ३४८ : महत्त्वाचे साक्षीदारास समन्स काढण्याचा किंवा उपस्थित व्यक्तीची तपासणी करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३४८ :
महत्त्वाचे साक्षीदारास समन्स काढण्याचा किंवा उपस्थित व्यक्तीची तपासणी करण्याचा अधिकार :
कोणतेही न्यायालय या संहितेखालील कोणतीही चौकशी, संपरीक्षा किंवा अन्य कार्यवाही कोणत्याही टप्प्यात असताना कोणत्याही व्यक्तीला साक्षीदार म्हणून समन्स काढू शकेल अथवा समक्ष हजर असलेल्या कोणत्याही व्यक्तीला साक्षीदार म्हणून समन्स काढलेले नसले तरी तिची साक्षतपासणी करू शकेल, अथवा आधीच साक्षतपासणी केलेल्या व्यक्तीला परत बोलावून तिची फफेरतपासणी करू शकेल; आणि अशा कोणत्याही व्यक्तीचा साक्षीपुरावा खटल्याचा निर्णय न्याय्यपणे होण्यासाठी अत्यावश्यक आहे असे दिसून आले तर, न्यायालय तिला समन्स काढून तिची साक्षतपासणी करील किंवा पुन्हा बोलावून फफेरतपासणी करील.

Leave a Reply