Bnss कलम ३४५ : माफीच्या शर्तीचे अनुपालन न केल्यास कार्यवाही (संपरीक्षा) :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३४५ :
माफीच्या शर्तीचे अनुपालन न केल्यास कार्यवाही (संपरीक्षा) :
१) कलम ३४३ किंवा कलम ३४४ खाली देऊ केलेली माफी जिने स्वीकारली आहे त्या व्यक्तीविषटी जेव्हा, आपल्या मते अशा व्यक्तीने अत्यावश्यक अशी काहीतरी गोष्ट बुध्दिपुरस्सर लपवून किंवा खोटी साक्ष देऊन, ज्या शर्तीवर तिला माफी देऊ करण्यात आली तिचे अनुपालन केलेले नाही असे सरकारी अभियोक्त्याने प्रमाणित केले असेल त्या बाबतीत, ज्या अपराधासंबंधात याप्रमाणे माफी देऊ करण्यात आली होती त्याबद्दल किंवा तयच बाबीच्यासंबंधात ती व्यक्ती ज्याबद्दल दोषी असल्याचे दिसून येईल अशा अन्य कोणत्याही अपराधाबद्दल आणि खोटी साक्ष दिल्याच्या अपराधाबद्दल अशा व्यक्तीची संपरीक्षा करता येईल.
परंतु, अशा व्यक्तीची संपरीक्षा अन्य आरोपींपैकी कोणाबरोबरही संयुक्तपणे केली जाणार नाही.
परंतु, आणखी असे की, अशा व्यक्तीची संपरीक्षा खोटी साक्ष दिल्याच्या अपराधाबद्दल उच्च न्यायालयाच्या मंजुरीखेरीज केली जाणार नाही, आणि ज्या अपराधास कलम २१५ किंवा कलम ३७९ मध्ये अंतर्भुत असलेली कोणतीही गोष्ट लागू होणार नाही.
२) देऊ केलेली माफी स्वीकारताना अशा व्यक्तीने दिलेला आणि कलम १८३ खाली दंडाधिकाऱ्याने किंवा ३४३ च्या पोटकलम (४) खाली न्यायालयाने नोंदलेला जबाब अशा संपरीक्षेत त्याच्याविरूध्द पुराव्यात देता येईल.
३) अशा संपरीक्षेत आरोपी, ज्या धर्तीवर अशी माफी देऊ करण्यात आली तिचे आपण अनुपालन केले आहे असे प्रतिकथन करण्यास हक्कदार असेल; आणि अशा बाबतीत, शर्त पाळण्यात आलेली नाही हे फिर्यादी पक्षालाा शाबीत करावे लागेल.
४) अशा संपरीक्षेत न्यायालय –
(a) क) (अ) ते सत्र न्यायालय असेल तर, आरेपीला दोषारोप वाचून दाखवण्यापुर्वी व समजावून सांगण्यापूर्वी;
(b) ख) (ब) ते दंडाधिकाऱ्याचे न्यायालय असेल तर, फिर्यादीपक्षाच्या साक्षीदारांची साक्ष घेण्यापूर्वी,
ज्या शर्तीवर माफी देऊ करण्यात आली त्या शर्ती आपण पाळल्या आहेत असे प्रतिकथन करावयाचे आहे का असे आरोपीला विचारील.
५) जर आरोपीने असे प्रतिकथन केले तर, न्यायालय ते प्रतिकथन नोंदवून घेईल आणि संपरीक्षा पुढे चालवील, आणि त्या खटल्याचा न्यायनिर्णय देण्यापूर्वी, आरोपीने माफीच्या शर्तीचे पालन केले आहे किंवा नाही हे ठरवील आणि त्याने तसे पालन केले आहे असे न्यायालयाने ठरवले तर, या संहितेत काहीही अंतर्भूत असले तरी, ते दोषमुक्तीचा न्यायनिर्णय देईल.

Leave a Reply