भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३३३ :
कोणापुढे असे प्रतिज्ञालेख करता येतात :
१) या कलमाखाली कोणत्याही न्यायालयासमोर उपयोजावयाचा प्रतिज्ञालेख –
(a) क) (अ) कोणत्याही न्यायाधीशासमोर अगर कोणत्याही न्याय किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर; अथवा
(b) ख) (ब) उच्च न्यायालयाने किंवा सत्र न्यायालयाने नियुक्त केलेल्या कोणत्याही शपथ आयुक्तासमोर; अथवा
(c) ग) (क) लेखप्रमाणक अधिनियम, १९५२ (१९५२ चा ५३ ) याखाली नियुक्त केलेल्या कोणत्याही लेखप्रमाणकासमोर,
शपथपूर्वक किंवा दृढकथनपूर्वक करता येईल.
२) प्रतिज्ञालेख हे, जबानीदार आपल्या माहितीवरून शाबीत करू शकेल अशी तथ्ये आणि जो खरी असल्याचे समजऱ्यात त्याला वाजवी कारण असेल अशी तथ्ये एवढयांपुरतेच मर्यादित राहतील आणि त्यात अशी तथ्ये वेगवेगळी नमूद केली जातील, आणि दुसऱ्या प्रकारच्या तथ्यांच्या बाबतीत जबानीदाराला असा समज होण्याची कारणे स्पष्टपणे नमूद करावी लागतील.
३) प्रतिज्ञालेखातील कोणतीही अपप्रवादात्मक किंवा असंबध्द बाब काढून टाकण्याबाबत किंवा ती विशोधित करण्याबाबत न्यायालय आदेश देऊ शकेल.