Bnss कलम ३३१ : लोकमानसांच्या वर्तनाच्या शाबितीसाठी प्रतिज्ञालेख (शपथपत्र) :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३३१ :
लोकमानसांच्या वर्तनाच्या शाबितीसाठी प्रतिज्ञालेख (शपथपत्र) :
जेव्हा या संहितेखालील कोणत्याही चौकशीच्या, संपरीक्षेच्या किंवा अन्य कार्यवाहीच्या ओघात कोणत्याही न्यायालयाकडे कोणताही अर्ज करण्यात आला असेल आणि त्यात कोणत्याही लोकसेवकाबाबत अभिकथने केलेली असतील तेव्हा, अर्जदाराला अर्जात अभिकथन केलेल्या तथ्यांचा पुरावा प्रतिज्ञालेकाद्वारे देता येईल, आणि न्यायालयाला योग्य वाटल्यास ते तशा तथ्यासंबंधीचा पुरावा तशा रीतीने देण्यात यावा असा आदेश देऊ शकेल.

Leave a Reply