Bnss कलम ३२९ : विवक्षित शासकीय वैज्ञानिक तज्ज्ञांचे अहवाल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३२९ :
विवक्षित शासकीय वैज्ञानिक तज्ज्ञांचे अहवाल :
१) जो दस्तऐवज हे कलम ज्याला लागू होते त्या शासकीय वैज्ञानिक तज्ज्ञाकडे या संहितेखालील कोणत्याही कार्यवाहीच्या ओघात तपासणी किंवा विश्लेषण यासाठी व अहवालासाठी रीतसर सादर केलेल्या कोणत्याही बाबीसंबंधीचा किंवा वस्तूसंबंधीचा त्याच्या सहीचा अहवाल असल्याचे दिसत असेल असा कोणताही दस्तऐवज या संहितेखालील कोणत्याही चौकशीत, संपरीक्षेत किंवा अन्य कार्यवाहीत पुरावा म्हणून वापरता येईल.
२) न्यायालयाला योग्य वाटल्यास ते अशा कोणत्याही तज्ज्ञाला समन्स पाठवून त्याच्या अहवालाच्या विषयवस्तूसंबंधात त्याची साक्षतपासणी करू शकेल.
३) जेव्हा न्यायालयाने अशा कोणत्याही तज्ज्ञाला समन्स पाठवले असेल व तो जातीने हजर राहण्यास असमर्थ असेल तेव्हा, न्यायालयाने त्याला जातीने हजर राहण्याबद्दल स्पष्टपणे निदेश दिलेला नसल्यास, तो आपल्याबरोबर काम करणारा जो कोणी जबाबदार अधिकारी त्या खटल्याच्या तथ्यांशी सुपरिचित असून न्यायालयात आपल्या वतीने समाधानकारकपणे जबानी देऊ शकत असेल अशा अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याबाबत प्रतिनियुक्त करू शकेल.
४) हे कलम पुढील शासकीय वैज्ञानिक तज्ज्ञांना लागू आहे, ते असे:
(a) क) (अ) शासनाचा कोणताही रसायन परीक्षक किंवा सहायक रसायन परीक्षक;
(b) ख) (ब) मुख्य नियंत्रक, स्फोटक द्रव्ये;
(c) ग) (क) संचालक, अंगुलि मुद्रा केंद्र;
(d) घ) (ड) संचालक, हाफकिन इन्स्टिटयूट, मुंबई.
(e) ङ) (इ) केंद्रीय न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा किंवा राज्य न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा संचालक, उपसंचालक किंवा सहाय्यक संचालक;
(f) च) (फ) शासनाचा रक्तजल शास्त्रज्ञ;
(g) छ) (ग) केंद्र शासनाने, या प्रयोजनासाठी अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेला इतर कोणताही शासकीय वैज्ञानिक तज्ज्ञ.

Leave a Reply